Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Megasporophyll’ in Marathi
‘Megasporophyll’ चा मराठी अर्थ
शब्द: Megasporophyll
उच्चार: मेगास्पोरोफिल
अर्थ: मेगास्पोर (स्त्रीबीजाणू) धारण करणारे वनस्पतीचे पान
अधिक माहिती: Megasporophyll ही फुलामधील मादा पुनरुत्पादक संरचना म्हणजे गायनोशिअमचा भाग आहे. याला कार्पेल/पिस्टिल (स्त्रीकेसर) असे म्हणतात. निदल, दल, पुंकेसर व स्त्रीकेसर हे एक रुपांतरीत पान समजले जातात. कार्पेल हे त्यातील ओव्हरीमधील ओव्ह्युलमधे स्त्रीबीजाणू तयार करते. यामुळे कार्पेल किंवा स्त्रीकेसराला स्त्रीबीजाणू तयार करणारे पान असे म्हणतात. (mega = मोठे; spore = बिजाणू; phyll = पान/पर्ण)