Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Male gametophyte’ in Marathi
‘Male gametophyte’ चा मराठी अर्थ
शब्द: Male gametophyte
उच्चार: मेल गॅमेटोफाइट
अर्थ: नर गॅमेट/नर युग्मक/नर जननपेशी बनवणारे शरीर
अधिक माहिती: Gametophyte हे गॅमेट्स (युग्मक/ जननपेशी) तयार करतात. गॅमेटोफाइट ही वनस्पतीच्या जीवनचक्रातील हॅप्लॉइड (एकगुणी) स्थिती आहे जी स्पोरोफाइट (डिप्लॉइड) स्थितीनंतर आलटून पालटून येते. स्पोरोफाइट स्थितीचे कार्य स्पोर (बीजाणू, मेगास्पोर किंवा मायक्रोस्पोर) तयार करणे हे आहे. मेगास्पोर व मायक्रोस्पोर च्या मिऑसिस (अर्धसूत्री विभाजन) ने अनुक्रमे हॅप्लॉइड मेल (नर) गॅमेटोफाइट व फिमेल (मादा) गॅमेटोफाइट तयार होतात जे पुढे जननपेशी (गॅमेट) बनवतात. निम्न (लोवर) वनस्पतींमधे स्पोरोफाइट व गॅमेटोफाइट हे दोन स्वतंत्र शरीर असतात व गॅमेटोफाइट हे हॅप्लॉइड (एकगुणी) स्थितितील मुख्य वनस्पती शरीर असते. उच्च वनस्पतींमधे गॅमेटोफाइट हे मुख्य स्पोरोफाइट शरीराच्या आत (फुलातील ॲथर व ओव्हरी) मधे अत्यंत सूक्ष्म रूपात विकसित होते. दोन हॅप्लॉइड गॅमेट (नर आणि मादा जननपेशी) यांच्या एकत्रीकरणाने डिप्लॉइड स्पोरोफाइट तयार होते.