Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Maharashtra Pollution Control Board’ in Marathi
‘Maharashtra Pollution Control Board’ चा मराठी अर्थ
शब्द: Maharashtra Pollution Control Board
उच्चार: महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड
अर्थ: महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ
अधिक माहिती: भारत सरकारने प्रदूषण नियंत्रण, नियमन व प्रदूषण रोखण्यासाठी काही कायदे केले आहेत, जसे की जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 इ. हे कायद्यांमधे जैव वैद्यकीय कचरा, धोकादायक उत्सर्ग, घनकचरा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण या सर्वांच्या नियंत्रण, व नियमनाचा समावेश केला गेला आहे. या कायद्यांतील नियमांचे विविध कारखाने, औद्यागिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती इत्यादी संस्थांद्वारे पालन केले जात आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थांद्वारे केले जाते.