Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Lungs’ in Marathi
‘Lungs’ चा मराठी अर्थ
शब्द: Lungs
उच्चार: लंग्ज
अर्थ: फुफ्फुस
अधिक माहिती: श्वसनसंस्थेतील छातीतील मध्यवर्ती अवयव. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एकेक फुफ्फुस असते. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुप्फुसांनी व्यापलेला असतो. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी आवरण असते, त्याला फुप्फुसावरण किंवा प्लुरा असे म्हणतात. फुप्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक (इलास्टिक) असतात. फुप्फुसांमधे वायूनलिका ही झाडाच्या फांद्यांप्रमाणे विभाजीत होत जात सर्वात शेवटी टोकाला गोलाकार लहान वायूपोकळी बनवतात. त्यांना वायुकोश किंवा आल्व्हिओली असे म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. या केशवाहिन्यांतून वाहणारे रक्त व वायुकोशातील हवा यांच्यादरम्यान वायंची देवाणघेवाण होते. ऑक्सिजन रक्तात शोषला जातो व कार्बनडाय ऑक्साइड रक्तातून बाहेर सोडला जातो यालाच बाह्यश्वसन असे म्हणतात.