Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Lithium ion cells’ in Marathi
‘Lithium ion cells’ चा मराठी अर्थ
शब्द: Lithium ion cells
उच्चार: लिथिअम आयन सेल्स
अर्थ: लिथिअम आयन विद्युतघट
अधिक माहिती: लिथिअम (Li) आयन विद्युत घटांमधे धन (+) विद्युत अग्र हा कार्बनचा, ऋण (-) विद्युत अग्र हा धातूच्या ऑक्साइडचा व विद्युत अपघटनी (electrolyte) म्हणून सेंद्रिय द्रावकामधील लिथिअमच्या क्षाराचा वापर केला जातो. लिथिअम (Li) आयन विद्युत घट आधुनिक कुठेही नेण्यासारख्या विद्युतसाधनांमधे वापरले जातात, जसे की स्मार्टफोन, लॅपटॉप, वीजेवर चालणारी वाहने इत्यादी. लिथिअम (Li) आयन विद्युत घट पुनःप्रभारित करता येतात. ह्यामध्ये निकेल-कॅडमिअम (Ni-Cd) विद्युतघटांपेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठविली जाऊ शकते.