Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Isotopes’ in Marathi
‘Isotopes’ चा मराठी अर्थ
शब्द: Isotopes
उच्चार: आयसोटोप्स
अर्थ: समस्थानिके, एकाच मूलद्रव्याचे समान अणुअंक परंतु भिन्न अणुवस्तुमानांक असणारे अणू
अधिक माहिती: काही मूलद्रव्यांमध्ये समान अणुअंक असणारे परंतु भिन्न अणुवस्तुमानांक असणारे अणू आढळतात. एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणुवस्तूमानांक असलेल्या अणूंना Isotopes किंवा समस्थानिके असे म्हणतात. उदा. कार्बन. अणुअंक 12 असणार्या कार्बनची तीन समस्थानिके आहेत. ती म्हणजे उदा. C-12, C-13, C-14. समस्थानिकांचा अणुवस्तुमानांक ¹²C, ¹³C व ¹⁴C ह्या पध्दतीनेही लिहिला जातो. समस्थानिकांमधे प्रोटॉनची संख्या समान असते परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते.