Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Blood Donation’ in Marathi
‘Blood Donation’ चा मराठी अर्थ
शब्द: Blood Donation
उच्चार: ब्लड डोनेशन
अर्थ: रक्तदान
अधिक माहिती: निरोगी व्यक्तीच्या शरीरातून त्याच्या इच्छेने विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते. रक्त दान करण्याच्या या प्रक्रियेला Blood Donation किंवा रक्तदान असे म्हणतात. रक्तदाता निरोगी असावा, त्याचे वय 18 ते 65 दरम्यान असावे, वजन किमान 50 किलो असावे, हृदयगती 50 ते 100 च्या दरम्यान नियमित असावी व रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी किमान 12.5 g/dl इतकी असावी, या रक्तदान करण्यासाठीच्या अटी आहेत. एकावेळी दात्याच्या शरीरातून 350 मीली रक्त काढले जाते. काढलेले हे रक्त, बाहेरून रक्त चढवण्याची आवश्यकता असणार्या रूग्णांना पुरवले जाते. जमा झालेले रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसांपर्यंत ठेवता येते. एकदा रक्तदान केल्यानंतर दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते.