Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Golgi Complex’ in Marathi
‘Golgi Complex’ चा मराठी अर्थ
शब्द: Golgi Complex
उच्चार: गोल्जी कॉम्प्लेक्स
अर्थ: गॉल्गी संकुल, गॉल्जीपिंड, गॉल्गी काय
अधिक माहिती: गॉल्गी संकुल हे पेशीतील ‘स्त्रावी अंगक’(स्राव निर्माण करणारे अंगक) आहे. गॉल्जिपिंड हे अनेक पटलांनी बनलेल्या चपट्या पिशव्यांनी तयार झालेले पेशी अंगक असते. यात एकमेकांना समांतर रचलेल्या 5-8 चपट्या, पोकळ कोश असतात ज्यांना कुंड (सिस्टर्नी) असे म्हणतात. कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात जी आंतर्द्रव्यजालिकेकडून आलेल्या प्रथिनांवर हवे ते जैवरासायनिक बदल घडवून आणतात. ही बदल घडवलेली प्रथिने पुन्हा गोलीय पीटिकांमध्ये बंदिस्त केली जातात व त्या पीटिका (व्हेसिकल्स) गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर टाकल्या जातात व पुढे त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचविले जाते. गॉल्जिपिंड हे प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे कार्य करते. कमिलिओ गोल्गी या शास्त्रज्ञाने या पेशी अंगकाचा शोध लावला म्हणून त्यांचे नाव या पेशी अंगकाला देण्यात आले.