Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fungi (Kingdom)’ in Marathi
‘Fungi (Kingdom)’ चा मराठी अर्थ
शब्द: Fungi (Kingdom)
उच्चार: फंगी किंगडम
अर्थ: कवक सजीवसृष्टी
अधिक माहिती: कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो ज्यांची पेशीभित्तिका ‘कायटीन’ या जटील शर्करेपासून बनलेली असते. बहुसंख्य कवके कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगणारे मृतोपजीवी आहेत. कवकांमधे विविध प्रकार आढळतात. कवकांची उदाहरणे – किण्व (बेकर्स यीस्ट) बुरशी, अॅस्परजिलस, पेनिसिलिअम, भूछत्रे (मशरूम) इ.