Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Flower’ in Marathi
‘Flower’ चा मराठी अर्थ
शब्द: Flower
उच्चार: फ्लॉवर
अर्थ: फुल, पुष्प
अधिक माहिती: Flower ही वनस्पतीची अशी विशेष पुनरुत्पादक संरचना असते ज्यामध्ये लैंगिक पुनरुत्पादन घडते. फ्लॉवर (/ फुल) चे कार्य हे हॅप्लॉइड गॅमेट्स (एकगुणी युग्मक/ सर्व क्रोमोझोम्स चा एकच संच असलेल्या पेशी) तयार करणे आणि फर्टिलायझेशन (नर व मादा गॅमेट्स चे मिलन / फलन) होईल हे सुनिश्चित करणे हे असते. फुला मध्ये एका मध्ये एक अशी मांडणी असलेले चार वेगवेगळे व्होर्ल्स (मंडल/चक्र) असतात. हे चार चक्र म्हणजे कॅलिक्स (calyx), कोरोला (corolla) अॅंड्रोसीयम (androecium) आणि गायनोसीयम (gynoecium) हे आहेत.