Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Evolution’ in Marathi
‘Evolution’ चा मराठी अर्थ
शब्द: Evolution
उच्चार: इव्हॉल्यूशन
अर्थ: उत्क्रांती
अधिक माहिती: चार्ल्स डार्विन यानी सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धात मांडला. त्यांनी उत्क्रांतीच्या सिद्धांतात असे सुचविले आहे की पृथ्वीवर आज आढ्ळणारे सजीवांचे विविध प्रकार हे पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या उत्क्रांती प्रक्रियेतून निर्माण झालेले आहेत. उत्क्रांती म्हणजे हळू हळू होणारे बदल. या सिद्धांताद्वारे त्यानी असे सुचविले आहे की, सजीव पुनरुत्पादन प्रक्रियेद्वारे पुढच्या पिढीत अनेक सजीव जन्माला घालतात. या सजीवांमधे नैसर्गिक बदल निर्माण झालेले असतात. या बदलांपैकी तत्कालीन परिस्थितीअनुरूप योग्य बदल असणारे सजीव हे जास्त पुनरुत्पादन करू शकतात व त्यामुळे तसे बदल असणार्या सजीवांची संख्या वाढते. व हळू हळू सजीवाची नवी प्रजात (species) निर्माण होते. ही प्रक्रिया निरंतर चालू असते. यालाच ‘natural selection’ किंवा नैसर्गिक निवड असे म्हणतात. डार्विन ने सुचविलेले ‘survival of the fittest’ म्हणजे ‘परिस्थितीला सर्वात अनुकूल बदल असलेला सजीवच जगेल व टिकेल’.