Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Electrical circuit’ in Marathi
‘Electrical circuit’ चा मराठी अर्थ
शब्द: Electrical circuit
उच्चार: इलेक्ट्रिकल सर्किट
अर्थ: विद्युत परिपथ
अधिक माहिती: विद्युत प्रवाहाच्या उगमापासून ज्या मार्गाने इलेक्ट्रॉन वाहतात त्या मार्गाला Electrical circuit किंवा ‘विद्युत परिपथ’ असे म्हणतात. विविध विद्युत उपकरणे तारांच्या सहाय्याने विशिष्ट क्रमाने जोडून विशिष्ट कार्य करणारे विद्युत परिपथ रचले जाऊअ शकतात. विविध विद्युत उपकरणांमधे (टि.व्ही., फ्रिज, रेडिओ इ.) विद्युत परिपथ त्या उपकरणांचे नियंत्रण करण्यासाठी वापरलेले असतात.