Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Dizygotic twins’ in Marathi
‘Dizygotic twins’ चा मराठी अर्थ
शब्द: Dizygotic twins
उच्चार: डायझायगॉटिक ट्विन्स
अर्थ: द्वियुग्मजी जुळे, दोन वेगवेगळ्या झायगोट पासून जन्मलेले जुळे
अधिक माहिती: दर मासिक चक्रात ओव्ह्युलेशन (अंडमोचन) दरम्यान एकच अंडपेशी (एग) ओव्हरी (अंडाशयातून) सोडली जाते. काही अपवादात्मक परिस्थितीत स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी दोन (किंवा जास्त) अंडपेशी बाहेर पडतात आणि त्या दोन वेगवेगळ्या स्पर्म/शुक्राणुंद्वारे त्या फलित होऊन दोन स्वतंत्र युग्मनज (झायगोट) तयार होतात. या दोन्ही वेगवेगळ्या युग्मजांपासून दोन वेगवेगळे भ्रूण (एम्ब्रिओ) तयार होऊन दोन्ही भ्रूणांचे गर्भाशयात रोपण (इम्प्लांटेशन) होते आणि त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर Dizygotic म्हणजेच द्वियुग्मजी जुळी अपत्ये जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि त्यांचे लिंग समान किंवा वेगवेगळे असू शकते.