Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Diffusion’ in Marathi
‘Diffusion’ चा मराठी अर्थ
शब्द: Diffusion
उच्चार: डिफ्युजन
अर्थ: विसरण
अधिक माहिती: जास्त संहितेकडून कमी संहितेकडे (म्हणजे जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाण असलेल्या जागेकडे) सहज होणारे पदार्थाच्या रेणूंचे वहन याला Diffusion किंवा विसरण असे म्हणतात. उदा. अत्तराची कुपी खोलीतील एका जागी उघडल्यास त्यातून सुगंधी पदार्थाचे रेणू सर्व दिशानी हवेत पसरतात म्हणजेच सुवास पसरतो. दुसरे उदाहरण म्हणजे स्थिर पाण्यात रंगाचा खडा किंवा थेंब टाकल्यास हळुहळू रंग सर्व पाण्यात पसरू लागतो.