Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Development of male gametophyte’ in Marathi
‘Development of male gametophyte’ चा मराठी अर्थ
शब्द: Development of male gametophyte
उच्चार: डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट
अर्थ: नर गॅमेटोफाइट (नर गॅमेट/युग्मक/जननपेशी बनवणारे शरीर) चा विकास
अधिक माहिती: मेल गॅमेटोफाइटच्या विकासाच्या प्रक्रियेत पोलन ग्रेन (परागकण) ही मेल गॅमेटोफाइट (मेल गॅमेट बनविणारे शरीर) ची सुरूवात असते. पोलन ग्रेन मध्ये पहिले मायटॉटिक पेशी विभाजन (सुत्री पेशी विभाजन) होऊन एक मोठी व्हेजिटेटिव्ह सेल (शरीर पेशी) आणि दुसरी लहान, पातळ पेशीभित्तिका असलेली जनरेटिव्ह सेल (पुनरुत्पादक पेशी) तयार होते. जनरेटिव्ह सेल (पुनरुत्पादक पेशी) ही व्हेजिटेटिव्ह सेल (शरीर पेशी) च्या साइटोप्लाझ्म (पेशीद्रव्य) मध्ये तरंगत असते. दुसरे मायटॉटिक सेल डिव्हिजन हे फक्त जनरेटिव्ह सेल (पुनरुत्पादक पेशी) मध्ये होते. जनरेटिव्ह सेल चे मायटॉसिसने पेशी विभाजन होऊन दोन मेल गॅमेट्स (नर जननपेशी) तयार होतात. जनरेटिव्ह सेल चे मायटॉटिक पेशी विभाजन हे एकतर पोलन ग्रेन मध्ये असताना होते किंवा नंतर फुलाच्या कुक्षीवर पडल्यानंतर पोलन ट्यूब (पराग नलिका) मध्ये असताना होते.