Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Development female gametophyte’ in Marathi
‘Development female gametophyte’ चा मराठी अर्थ
शब्द: Development female gametophyte
उच्चार: डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट
अर्थ: मादा जननपेशी बनविणार्या शरीराचा विकास
अधिक माहिती: ओव्ह्युलच्या न्यूसेलस मधे जवळपास मध्यभागी परंतु थोडा मायक्रोपाईल च्या टोकाकडे मेगास्पोर मदर सेल विकसित होते. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल मध्ये मिऑसिस प्रक्रियेने पेशीविभाजन होते, ज्यामुळे चार हॅप्लॉइड पेशी म्हणजेच मेगास्पोअर लिनिअर टेट्रॅड (एका रेषेत असलेल्या चार पेशी) तयार होतात ज्याला मेगास्पोर टेट्रॅड असे म्हणतात. या चार मेगास्पोअर (स्त्रीबीजाणू) पेशींपैकी वरचे तीन मेगास्पोअर्स हे अबॉर्ट होतात (नष्ट होतात) आणि चार पेशींमधील सर्वात खालची पेशी हीच फक्त सक्षम राहते. हीच पेशी फिमेल गॅमेटोफाइट (मादा जननपेशी बनविणारे वनस्पती शरीर) ची पहिली पेशी म्हणून कार्य करते. या सक्षम राहीलेल्या पेशीमध्ये तीन वेळा सलग एकानंतर एक फ्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन होतात. यात फक्त पेशीकेंद्रकाचे विभाजन होते पेशीद्रव्याचे विभाजन होत नाही त्यामुळे एकाच पेशीमधे अनेक पेशीकेंद्रके तयार होतात. या तीनवेळा झालेल्या विभाजनांमुळे एकूण आठ न्युक्लिआइ (पेशी केंद्रके) तयार होतात (2 X 2 X 2 = 8), त्यापैकी प्रत्येकी चार न्युक्लिआइ हे प्रत्येक पोल (ध्रुव) वर असतात. प्रत्येक पोल (ध्रुव) जवळ असलेया चार न्यूक्लिअस पैकी प्रत्येकी एक न्यूक्लिअस हे पेशीच्या मध्यभागाकडे स्थलांतर करते. मध्यभागी आलेल्या या दोन न्युक्लीआईना पोलर न्युक्लीआई (धृवाकडून आलेली पेशीकेंद्रके) असे म्हणतात. मायक्रोपाईलकडच्या टोका च्या दिशेने असलेले तीन न्युक्लीआई (पेशीकेंद्रके) हे एग अॅपरॅटस (एक अंड पेशी आणि दोन सहायक पेशी यांनी बनलेली व्यवस्था) बनतात. एग अॅपरॅटस मध्ये एक मोठी, मध्यवर्ती, हॅप्लॉइड अंडपेशी आणि आजूबाजूला दोन सहयोगी हॅप्लॉइड सिनर्जीड (सहायक) पेशी असतात. सिनर्जीड (सहायक) पेशी वर नावाचे केसांसारखे बाहेरच्या दिशेने निघालेले तंतू असतात ज्यांना Filiform apparatus असे म्हणतात, फिलिफॉर्म अॅपरॅटस हे पोलन ट्यूब (परागनलिका) ला एग (अंडपेशी) कडे पोहोचण्यासाठी मार्गदर्शन/सहाय्य करतात. ओव्ह्युलच्या मायक्रोपाइल एंड च्या विरुद्ध बाजुला ओव्ह्युलचे चलाझल एंड (ओव्ह्युलच्या पायाच्या बाजूचे टोक) असते. चलाझल एंड वर असलेल्या तीन पेशींच्या समूहाला अॅन्टीपोडल सेल्स (ओव्ह्युलमधे पायाच्या बाजूला असणार्या पेशी) असे म्हणतात. अशाप्रकारे या या सात पेशी आणि आठ न्युक्लीआई (पेशीकेंद्रकं) असलेल्या विकसित फिमेल गॅमेटोफाइटला एम्ब्रियो सॅक (भ्रुण थैली/गर्भ पिशवी) असे म्हणतात. [सात पेशी = 3 अॅन्टीपोडल पेशी (प्रत्येकी एक न्युक्लिअस) + 2 सिनर्जीड (प्रत्येकी एक न्युक्लिअस) + 1 एग पेशी (एक न्युक्लिअस) +1 मोठी मध्यवर्ती पेशी (दोन न्युक्लिअस सह)]