Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Comorbidities’ in Marathi
‘Comorbidities’ चा मराठी अर्थ
शब्द: Comorbidities
उच्चार: कोमॉर्बिडिटिज
अर्थ: सहव्याधी
अधिक माहिती: उपचार सुरु असणार्या मुख्य आजारासोबत असणारे इतर आजार . उदा. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला इतर आजार जसे की, रक्तदाब, मधुमेह इ. असतील तर रक्तदाब, मधुमेह इ. ला comorbidities किंवा सहव्याधी असे म्हणतात.
सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी संसर्गजन्य रोगाच्या परिस्थितीत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. वैद्यकिय सल्ला घेताना डॉक्टरांना तुम्हाला असणाऱ्या सर्व comorbidities ची पूर्ण कल्पना द्यावी, याचा त्यांना योग्य औषधोपचार व उपचारांची दिशा ठरवण्यासाठी फायदा होतो.