Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Circulatory system’ in Marathi
‘Circulatory system’ चा मराठी अर्थ
शब्द: Circulatory system
उच्चार: सर्क्युलेटरी सिस्टिम
अर्थ: रक्ताभिसरण संस्था
अधिक माहिती: सजीवांच्या जीवनप्रक्रिया चालू राहण्यासाठी अन्न व ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. पेशींमधे शर्करेचे ऑक्सिडेशन घडवून ऊर्जानिर्मिती होण्यासाठी शर्करा व ऑक्सिजनचा सतत पुरवठा व्हावा लागतो. हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसांमार्फत रक्तात शोषून शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचवणे व टाकाऊ कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे, ही कामे श्वसनसंस्था व रक्ताभिसरण संस्थामार्फत होतात. रक्तामार्फत पचन केलेली पोषकतत्वे, ऑक्सिजन, संप्रेरके, पाणी, इ. चे वहन शरीरातील सर्व पेशींपर्यंत होणे आवश्यक असते. रक्ताभिसरण संस्था रक्त सर्व शरीरभर पुन्हा पुन्हा फिरवण्याचे कार्य करते. रक्ताभिसरणसंस्थेत कार्य करणारे अवयव – हृदय, रक्तवाहिन्या, केशिका इ.