Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Changes in the uterus during menstrual cycle’ in Marathi
‘Changes in the uterus during menstrual cycle’ चा मराठी अर्थ
शब्द: Changes in the uterus during menstrual cycle
उच्चार: चेंजेस इन द युटेरस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन
अर्थ: मासिक पाळीच्या काळात गर्भाशयात होणारे बदल
अधिक माहिती: मासिक चक्राच्या सुरुवातीला इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशय (युटेरस) च्या अंतःस्तराची (एन्डोमेट्रिअमची) पुनर्निमिती होते. ओव्हरी (अंडाशय) मधे वाढणाऱ्या फॉलिकल (पुटिका) ची वाढ पूर्ण झाल्यानंतर ‘पितपिंडकारी संप्रेरक’ (Luteinizing hormone) च्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका (फॉलिकल) फुटते व त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. याला ओव्ह्युलेशन (अंडमोचन) असे म्हणतात. अंडाशयामध्ये राहिलेल्या फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते. हे पितपिंड ‘प्रोजेस्टेरॉन संप्रेरक’ स्त्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील (एन्डोमेट्रिअमच्या) ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते व असे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. अंडपेशीचे शुक्रजंतूद्वारे 24 तासात फलन न झाल्यास पितपिंड (कॉर्पस ल्युटिअम) अकार्यक्षम होते व ते श्वेतपिंडात (Corpus albicans) रुपांतरित होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते. या दोन्ही संप्रेरकांच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचे (एन्डोमेट्रिअमचा) विघटन होण्यास सुरुवात होते व अंतःस्तराच्या ऊतींचे अवशेष आणि अफलित अंडपेशी (एग) हे रक्तस्रावासोबत योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. हा रक्तस्त्राव साधारणतः पाच दिवस सुरु राहतो. यालाच ऋतुस्त्राव किंवा मासिक पाळी असे म्हणतात.