Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Cellular Respiration’ in Marathi
‘Cellular Respiration’ चा मराठी अर्थ
शब्द: Cellular Respiration
उच्चार: सेल्युलर रेस्पिरेशन
अर्थ: पेशीश्वसन
अधिक माहिती: सजीवांच्या जीवनप्रक्रिया चालू राहण्यासाठी अन्न (पोषकतत्वे व शर्करा) व ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. पेशींमधे शर्करेचे ऑक्सिडेशन घडवून ऊर्जानिर्मिती होण्यासाठी शर्करा व ऑक्सिजनचा सतत पुरवठा व्हावा लागतो. पेशींतील ग्लूकोज या शर्करेचे ऑक्सिजन वापरून अनेक चक्राकार टप्प्यांच्या क्रमवार जैवरासायनिक अभिक्रियांमार्फत ऑक्सिडेशन होऊन ATP च्या स्वरूपात ऊर्जा मिळवली जाते. प्रत्येक टप्प्यावर एक विशिष्ट विकर (एंज़ाइम) कार्य करते. या प्रक्रियेत CO₂ हे निरुपयोगी पदार्थ व पाण्याचे रेणू तयार होतात. या प्रक्रियेला Cellular respiration किंवा पेशीश्वसन असे म्हणतात. तसेच अभिक्रियांच्या या चक्राला सिट्रिक ॲसिड सायकल, टीसीए सायकल, क्रेब्ज सायकल अशा विविध नावांनी ओळखले जाते. या चक्राकार अभिक्रिया अंतिम संक्षिप्त रूपात पुढील समीकरणाच्या रूपाने मांडल्या जातात. C₆H₁₂O6 + 6O₂ —-à 6CO₂ + 6H₂O+ ऊर्जा (38ATP)