Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Capillary network’ in Marathi
‘Capillary network’ चा मराठी अर्थ
शब्द: Capillary network
उच्चार: कॅपिलरी नेटवर्क
अर्थ: सूक्ष्मरक्तवाहिन्यांचे जाळे, सूक्ष्मरक्तवहन संस्था
अधिक माहिती: धमन्या (आर्टरीज) हृदयाप्सून संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करतात. रक्तवाहिन्या शरीरभर पसरताना जसे जसे विविध अवयव व अवयवांमधील उती व पेशींपर्यंत पोहोचतात तसे तसे त्यांना फाटे फुटत जातात व त्यांचा व्यास लहान लहान होत जातो. सर्वात शेवटी रक्तवाहिन्या अत्यंत बारीक होऊन होतात त्यांना capillaries किंवा सूक्ष्मरक्तवाहिन्या/केशिका असे म्हणतात. या सूक्ष्मरक्तवाहिन्यांच्या भिंती अत्यंत पातळ, पेशींच्या एकाच स्तराने बनलेल्या असतात. उतींमधे सूक्ष्मरक्तवाहिन्या पेशीपातळीवरील जाळे तयार करतात याला capillary network किंवा सूक्ष्मरक्तवाहिन्यांचे जाळे असे म्हणतात. पातळ भिंतींमुळे सूक्ष्मरक्तवाहिन्यातील रक्त आणि पेशी यांच्या दरम्यान पोषक तत्वे, वायू, संप्रेरके, टाकाऊ पदार्थ इ. यांची देवाणघेवाण सुलभ होते. या सूक्ष्मरक्तवाहिन्या पुढे पेशी, उतींमधून जसे जसे बाहेर निघतात तसे तसे त्या एकत्र जोडल्या जातात व त्यांचा व्यास वाढत जातो त्यांनाच शिरा (व्हेन्स) असे म्हणतात. शिरा (व्हेन्स) शरीरातील अवयवांपासून रक्त हृदयापर्यंत वाहून नेतात.