Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Blood circulation’ in Marathi
‘Blood circulation’ चा मराठी अर्थ
शब्द: Blood circulation
उच्चार: ब्लड सर्क्युलेशन
अर्थ: रक्ताभिसरण
अधिक माहिती: हृदयाच्या जोरदार आकुंचन व प्रसरणाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस Blood circulation किंवा ‘रक्ताभिसरण’ असे म्हणतात. शरीरातील रक्त संपुर्ण शरीरातील अवयव, उती, व पेशींच्या संपर्कात यावे म्हणून शरीरात फिरवणे आवश्यक असते. शरीराने पचवलेली पोषक द्रव्ये व प्राणवायू प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवणे व त्या प्रत्येक पेशीत तयार झालेले टाकाऊ विषारी पदार्थ काढणे हे रक्तभिसरणाने साध्य होते.