Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Animalia (Kingdom)’ in Marathi
‘Animalia (Kingdom)’ चा मराठी अर्थ
शब्द: Animalia (Kingdom)
उच्चार: ॲनिमॅलिआ किंगडम
अर्थ: प्राणी सजीवसृष्टी
अधिक माहिती: बहुपेशीय दृश्यकेंद्रकी परपोषी सजीवांचा समावेश प्राणी सृष्टीत केला जातो. दृश्यकेंद्रकी पेशीत पटलबद्ध केंद्रक व पेशीअवयव असतात. पेशी भोवती पेशीभित्तीका नसते. प्राणी अन्न म्हणून वनस्पती किंवा इतर प्राण्यांचा वापर करतात. उदाहरणे- हरिण, ससा, वाघ, मगर इ.