Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ageing process’ in Marathi
‘Ageing process’ चा मराठी अर्थ
शब्द: Ageing process
उच्चार: एजिंग प्रोसेस
अर्थ: वृद्धत्व प्रक्रिया/ म्हातारे होत जाण्याची प्रक्रिया
अधिक माहिती: Ageing Process किंवा वृद्धत्व प्रक्रिया ही सजीवांमधे सतत चालणारी नैसर्गिक बदलांची प्रक्रिया आहे ज्यामधे वाढत्या वयानुसार सजीवाच्या शरीरातील पेशी व अवयव त्यांची कार्यक्षमता गमावण्यास प्रारंभ करतात आणि म्हातारे होतात. सजीवाच्या शरीराची पुर्ण वाढ झाल्यानंतर वृद्धत्व प्रक्रिया सुरू होते. सजीवांच्या वेगवेगळ्या प्रजातींमधे वृद्धत्व प्रक्रिया सुरू होण्याचा कालावधी त्या प्रजातीच्या वैशिष्ट्यानुसार वेगवेगळा असतो.