Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Yellow fungus’ in Marathi
‘Yellow fungus’ चा मराठी अर्थ
शब्द: Yellow fungus
उच्चार: यलो फंगस
अर्थ: म्युकर सेप्टिकस’ नावाच्या बुरशीमुळे होणारा आजार
अधिक माहिती: म्युकर सेप्टिकस (Mucor septics) नावाच्या बुरशीमुळे होणारा संसर्ग. संसर्ग झालेल्या ठिकाणी पिवळा पू जमा होतो यामूळे याला Yellow fungus म्हणजे पिवळी बुरशी असे म्हणतात. म्युकर नावाची बुरशी ही सर्वत्र आढळते मात्र ती सहसा मनुष्यामधे आजार निर्माण करत नाही कारण मनुष्याची प्रतिकारक्षमता या बुरशीला शरीरात प्रवेश करून संसर्ग करू देत नाही. मात्र काही रोगांमुळे, किंवा अन्य कारणांमुळे रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यास ही बुरशी संसर्ग निर्माण करू शकते. मनुष्याची रोगप्रतिकारक्षमता कमी करणार्या औषधांमुळे ही या बुरशीच्या संसर्गाला संधी मिळू शकते. Yellow fungus ची लक्षणे म्हणजे आळसावणे (lethargy), भूक मंदावणे, वजन कमी होणे ही आहेत. अधिक गंभीर स्थितीमधे पिवळा पू जमा होणे, जखाम भरण्याचा वेग मंदावणे, कुपोषणामुळे डोळे खोल जाणे ही लक्षणे दिसू शकतात. Yellow fungus ची लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ल्याने उपचार घ्यावेत.