Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘White Blood Cells (WBCs)’ in Marathi
‘White Blood Cells (WBCs)’ चा मराठी अर्थ
शब्द: White Blood Cells (WBCs)
उच्चार: व्हाइट ब्लड सेल्स
अर्थ: श्वेत रक्तपेशी, पांढर्या रक्तपेशी
अधिक माहिती: रक्तातील पांढर्या रक्तपेशी या आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, व रंगहीन पेशी असतात. रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमधे 5000 ते 10,000 पांढऱ्या पेशी असतात. पांढर्या रक्तपेशींचे 5 प्रकार आहेत, ते म्हणजे बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील, मोनोसाईट्स व लिम्फोसाईट्स. त्यांचे कार्य रोगप्रतिकारसंस्थेशी निगडीत असते. शरीरात रोगजंतूचा शिरकाव झाल्यास पांढर्या रक्तपेशी त्यावर हल्ला करतात व त्यांना नष्ट करतात. रक्तपट्टीका पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या 13 ते 20 दिवस जगतात.