Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Vulcanization’ in Marathi
‘Vulcanization’ चा मराठी अर्थ
शब्द: Vulcanization
उच्चार: व्हल्कनायझेशन
अर्थ: रबराला कठीणपणा आणण्यासाठी सल्फर (विशिष्ट प्रमाणात) मिसळून तीन ते चार तास तापवण्याची क्रिया
अधिक माहिती: चार्ल्स गुडइअर या वैज्ञानिकाकडून अपघाताने रबर व सल्फरचे मिश्रण जळत्या स्टोव्हवर सांडले. मिश्रणाने आग पकडली. जेव्हा ती आग विझवली गेली व मिश्रण थंड झाले तेव्हा चार्ल्स गुडइअरच्या लक्षात आले की रबर आता जास्त कठिण व कमी स्थितिस्थापक (कमी इलास्टिक) बनले आहे. अशाप्रकारे व्हल्कनायझेशन ची प्रक्रिया शोधली गेली. या प्रकारच्या रबराला व्हल्कनाइझ्ड रबर असे म्हणतात. अशा प्रकारच्या रबराचे अनेक उपयोग आहेत. उदा. टायर, चेंडू, विविध वस्तू, इ.