Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Virus’ in Marathi
‘Virus’ चा मराठी अर्थ
शब्द: Virus
उच्चार: व्हायरस
अर्थ: विषाणू
अधिक माहिती: विषाणू हे प्रथिनांचे आवरण असणारे अतिशय सूक्ष्म कण असतात ज्यांच्यामधे जनुकिय साहित्य असते व त्यांची जीवनप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना ठराविक प्रकारच्या जिवंत पेशीमधे प्रवेश करावा लागतो. विषाणूंना साामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव-निर्जिवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. विषाणूचे निरिक्षण करण्याकरिता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो. विषाणू म्हणजे प्रथिनांचे आवरण असलेल्या DNA (डीऑक्सीरायबो न्युक्लिक आम्ल) किंवा RNA (रायबो न्युक्लिक आम्ल) पासून बनलेला कण असतो. विषाणू हे जीवाणूपेशी, प्राणीपेशी व वनस्पतीपेशींचा यजमान म्हणून वापरकरतात व आपली परजीवी जीवनप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पेशीतील साहित्याचा वापर करतात. यजमान पेशींचा वापर करून विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. विषाणूंच्या संक्रमणामुळे ते वनस्पती व प्राण्यांमधे विविध रोगास कारणीभूत होतात. उदा. पोलिओ विषाणू, इन्फ्लुएंझा विषाणू, HIV-एड् स विषाणू, पॅपिल्लोमा व्हायरस, टोबॅको मोझॅक व्हायरस इ.