Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Uterus’ in Marathi
‘Uterus’ चा मराठी अर्थ
शब्द: Uterus
उच्चार: युटेरस
अर्थ: गर्भाशय
अधिक माहिती: Uterus म्हणजे गर्भाशय हे स्नायुने बनलेले पोकळ अवयव आहे जे स्त्रीशरीरामधे मुत्राशयाच्या मागे स्थित असते. गर्भाशयाचा आकार 7.5 सेमी लांब, 5 सेमी रुंद आणि 2.5 सेमी जाड असतो. फंडस, बॉडी आणि सर्व्हिक्स (गर्भाशयमुख) हे गर्भाशयाचे तीन भाग आहेत. आतून गर्भाशयाचे तीन स्तर असतात, सर्वात आतला एंडोमेट्रिअम (अंतःस्तर), मधला मायोमेट्रिअम (स्नायूस्तर) आणि सर्वात बाहेरचा पेरिमेट्रिअम (बाह्यस्तर). गर्भाशयाला Womb असेही म्हणतात.