Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Unified mass unit’ in Marathi
‘Unified mass unit’ चा मराठी अर्थ
शब्द: Unified mass unit
उच्चार: युनिफाइड मास युनिट
अर्थ: एका प्रोटॉनचे वस्तुमान, अवअणुकणांचे वस्तुमान व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे एकक
अधिक माहिती: एक युनिफाइड मास म्हणजे प्रभाररहित स्वतंत्र कार्बन (Carbon-12) अणुच्या वस्तूमानाचा बारावा हिस्सा. (कार्बन या मूलद्रव्याचा अणुअंक 12 आहे). युनिफाइड मास u या चिन्हाद्वारे दर्शविले जाते. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 डाल्टन किंवा 1 u (unified mass) इतके असते (1 डाल्टन म्हणजे 1 u =1.66 X 10 ˉ²⁷ kg). 1 u हे वस्तूमान सुमारे हायड्रोजनच्या एका अणुइतके असते.