Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Two stroke engine’ in Marathi
‘Two stroke engine’ चा मराठी अर्थ
शब्द: Two stroke engine
उच्चार: टु स्ट्रोक इंजिन
अर्थ: असे इंजीन ज्यात इंधन ज्वलन व जळलेला धूर बाहेर टाकण्याचे एक चक्र पूर्ण होण्यासाठी दट्ट्या दोन वेळा आतबाहेर होतो.
अधिक माहिती: या प्रकारचे इंजीन कमी कार्यक्षम असते व इंधनतेलाचे ज्वलन संपूर्नपणे होत नाही. या इंजीनासाठी वापरायच्या इंधनतेलात वंगण तेल /ल्युब्रिकंट ऑइल मिसळावे लागते. या प्रकारचे इंजीनामधे कमी भाग असतात, त्यामुळे ही स्वस्त असतात मात्र याप्रकारची इंजीने जास्त काळ टिकत नाहीत. या प्रकारची इंजीने जुन्या दुचाकीमधे वापरली जात असत.