Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Triploid’ in Marathi
‘Triploid’ चा मराठी अर्थ
शब्द: Triploid
उच्चार: ट्रिप्लॉइड
अर्थ: त्रिगुणी, तिप्पट, मूळ रंगसुत्रांचे तीन संच असणारी पेशी
अधिक माहिती: प्रत्येक सजीव प्रजातीच्या पेशींमधे ठरावीक मूळ रंगसुत्रांची (क्रोमोझोम्स) विशिष्ट संख्या असते. त्या संख्येला हॅप्लॉइड संख्या असे म्हणतात व हॅप्लॉइड संख्येच्या तिप्पट रंगसुत्र असणार्या पेशीला Triploid पेशी असे म्हणतात. ट्रिप्लॉइड हे वांझोटे (स्टराइल) असतात व लैंगिक प्रजनन करू शकत नाहित उदा. केळीचे झाड.