Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Thrombocytes’ in Marathi
‘Thrombocytes’ चा मराठी अर्थ
शब्द: Thrombocytes
उच्चार: थ्रॉम्बोसाइट्स
अर्थ: रक्तपट्टीका, शब्दशः अर्थ – (रक्ताची) गुठळी बनवणार्या पेशी
अधिक माहिती: रक्तपट्टीका (प्लेटलेट्स/थ्रॉम्बोसाइट्स) या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या पेशी असतात. त्यांच्यामधे केंद्रक नसते. एक घनमिलीमीटर रक्तामध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष रक्तपट्टीका असतात. यांची निर्मिती अस्थिमज्जेतील मेगाकॅरिओसाइट्स (मोठे केंद्रक असणार्यापेशी) च्या पेशीद्रव्याचे विखंडन होऊन बनलेल्या तुकड्यांनी होते. रक्तपट्टीका या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.