Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Thomson’s plum pudding model of atom’ in Marathi
‘Thomson’s plum pudding model of atom’ चा मराठी अर्थ
शब्द: Thomson’s plum pudding model of atom
उच्चार: थॉमसन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम
अर्थ: थॉमसनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप
अधिक माहिती: अणू कशाचा बनलेला असतो या प्रशाचे उत्तर देण्यासाठी जे. जे. थॉमसन ह्या वैज्ञानिकाने हे प्रारूप मांडले होते. जे. जे. थॉमसन यांनी अणूच्या आतील कण इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता व ते ऋणप्रभारित असल्याचे मत मांडले. मात्र अणूच्या आत असलेला इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित असेल तर तो अणू व त्या अणूंपासून बनलेला पदार्थ देखील ऋणप्रभारित असला पाहिजे मात्र प्रत्यक्षात पदार्थ उदासिन असतात म्हणजेच त्यांच्यावर कुठलाही प्रभार नसतो. हे कसे शक्य आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जे. जे. थॉमसन यांनी अणूची संरचना ही प्लम पुडिंग या केक सारख्या पदार्थासारखी असते असे मत मांडले. ज्याप्रमाणे प्लम पुडिंग मधे प्लम या फळाचे तुकडे विखुरलेले असतात त्याप्रमाणे अणूमधे सर्वत्र धन (+) प्रभार (पुडिंगसारखा) पसरलेला असतो व त्यामध्ये ॠण (-) प्रभारित इलेक्ट्रॉन (प्लम फळाच्या तुकड्यांसारखे) जडवलेले असतात. अणूमधे पसरलेल्या धनप्रभाराच संतुलन इलेक्ट्रॉनांवरील ॠणप्रभारामुळे होते. त्यामुळे अणू विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन होतो.