Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Thalassaemia’ in Marathi
‘Thalassaemia’ चा मराठी अर्थ
शब्द: Thalassaemia
उच्चार: थॅलॅसिमिआ
अर्थ: जनुकिय रक्ताल्पता, अनुवांशिक कारणामुळे रक्तातील तांबड्या पेशीं व हिमोग्लोबीनची कमतरता
अधिक माहिती: Thalassaemia हा अनुवांशिक आजार आहे. यात हिमोग्लोबीन प्रथिन बनवण्याची माहीती कूटबद्ध असलेल्या डीएनए मधे म्युटेशन (जनुकिय बदल) झाल्यामुळे हिमोग्लोबीन प्रथिन कमी प्रमाणात बनते किंवा योग्य कार्यक्ष्म स्वरूपात बनत नाही. त्यामुळे लाल रक्तपेशीची कमतरता निर्माण होते. हिमोग्लोबीन हे लाल रक्तपेशींमधील ऑक्सिजन वाहून नेणारे प्रथिन आहे. त्याच्या कमतरतेमुळे किंवा अक्षमतेमुळे रुग्ण अशक्त होतो. रूग्णाला सतत ठराविक कालावधी नंतर जुळणार्या रक्तगटाचे रक्त बाहेरून चढवावे लागते.