Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Taxonomical Key’ in Marathi
‘Taxonomical Key’ चा मराठी अर्थ
शब्द: Taxonomical Key
उच्चार: उकल, इशारा, ओळख पटवण्याची खूण, ओळख चिन्ह
अर्थ: टॅक्झोनॉमीमधे Key या वनस्पतींच्या स्पेसीज (जाती) ची ओळख पटवण्यासाठी ओळखीच्या खुणा / ओळख चिन्ह बद्दल माहिती पुरविते. एखाद्या विशिष्ट वनस्पतीची ओळख पटवण्यासाठी रचलेल्या की मधे अनेक टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर वनस्पतीच्या एका वैशिष्ट्याबद्द्ल परस्परविरोधी दोन पर्याय (statement/विधान) दिले जातात (उदा. पानांच्या कडा – सलग / दंतेरी). Key मधील प्रत्येक विधानाला लीड (Lead) असे म्हणतात. त्यातील वनस्पतीला लागू असलेले एक विधान / पर्याय स्वीकारले जाते व त्या पर्यायापुढे दिलेल्या सुचनेनुसार पुढच्या टप्प्यावरील परस्परविरोधी पर्याय पडताळले जातात. ही प्रक्रिया वनस्पतीची वैशिष्ट्ये पूर्णपणे पडताळून वनस्पतीच्या स्पेसिज ची ओळख पटेपर्यंत केली जाते.
अधिक माहिती: