Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Taxonolical Aids’ in Marathi
‘Taxonolical Aids’ चा मराठी अर्थ
शब्द: Taxonolical Aids
उच्चार: टॅक्झोनॉमिकल अेड्स
अर्थ: वर्गीकरण शास्त्रातील सहाय्यक साधनं, वर्गीकरणातील सहाय्यकं
अधिक माहिती: पृथ्वीवर सजीवांची प्रचंड विविधता आहे. सजीवांच्या कोट्यवधी प्रजातींची वैशिष्ट्ये लक्षात ठेवणे व ती प्रजात नेमकी ओळखणे हे कुणालाही शक्य नाही. या प्रचंड जैवविविधतेचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्यास, Taxonolical Aids म्हणजेच वर्गीकरण शास्त्रातील सहाय्यक साधनं म्हणून ओळखली जाणारी काही सहाय्यकं (Aids) वापरली जाऊ शकतात. या सहाय्यकांमध्ये हर्बेॅरिया, बोटॅनिकल गार्डन, म्युझिअम, बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादींचा समावेश होतो.