Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Systemic aorta’ in Marathi
‘Systemic aorta’ चा मराठी अर्थ
शब्द: Systemic aorta
उच्चार: सिस्टेमिक ॲओर्टा
अर्थ: महाधमनी, महारोहिणी
अधिक माहिती: महाधमनी (ॲओर्टा) हे डाव्या निलयातील (लेफ्ट व्हेंट्रिकल) ऑक्सिजनमिश्रीत ताजे रक्त डावे निलय आकुंचन पावल्यावर संपुर्ण शरीरातील अयवांकडे पोहोचवण्याचे कार्य करते. डाव्या निलयातून निघल्यावर महाधमनी (ॲओर्टा) ही कमानीसारखी वाकते (ॲओर्टिक आर्च) व शरीराच्या खालच्या दिशेकडे (डिसेंडिंग ॲओर्टा) जाते. महाधमनीच्या कमानी (ॲओर्टिक आर्च) वर तीन शाखा निघतात त्या उजवा हात, डोके आणि डाव्या हाताला रक्तपुरवठा करतात.