Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Surrogacy’ in Marathi
‘Surrogacy’ चा मराठी अर्थ
शब्द: Surrogacy
उच्चार: सरोगसी
अर्थ: भाडोत्री मातृत्व, दुसर्या स्त्रीचे बाळ आपल्या गर्भाशयात वाढवणे
अधिक माहिती: स्त्रीचे गर्भाशय रोपणक्षम (गर्भाचे रोपण होण्यासा सक्षम) नसल्यास अश्या स्त्रीला नैसर्गिकपणे गरोदर राहता येत नाही त्यामुळे मूल होत नाही. अश्या परिस्थितीत गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून (ओव्हरीमधून) अंडपेशी मिळवली जाते. या अंडपेशीचे व त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचे (स्पर्म) काचनलिकेमध्ये (टेस्ट ट्युब मधे) फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण (एम्ब्रिओ) दुसऱ्या (इतर) गर्भाशय सक्षम असलेल्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण (इंप्लांट) केला जातो. ज्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण-रोपण केले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता (Surrogate Mother) म्हणतात. गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर सरोगेट मदर बाळाला जन्म देते व ते बाळ जैविक मातापित्याच्या स्वाधीन करते.