Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Standard form of number’ in Marathi
‘Standard form of number’ चा मराठी अर्थ
शब्द: Standard form of number
उच्चार: स्टॅंडर्ड फॉर्म ऑफ नंबर
अर्थ: संख्येचे प्रमाणित रूप
अधिक माहिती: खूप मोठी संख्या किंवा एक पेक्षा खूप लहान संख्या लिहिताना एक अंकी पूर्णांक असलेली दशांश अपूर्णांकी संख्या व 10 चा घात यांचा गुणाकार करून लिहितात. याला त्या संख्येचा Standard form किंवा प्रमाणित रूप असे म्हणतात. उदा. 63520000 ही संख्या प्रमाणित रुपात 6.352X10⁷ अशी लिहितात तर 0.00000746 ही संख्या 7.46X10ˉ ⁶ अशी लिहितात.