Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sodium vapour lamp’ in Marathi
‘Sodium vapour lamp’ चा मराठी अर्थ
शब्द: Sodium vapour lamp
उच्चार: सोडिअम व्हेपर लॅंप
अर्थ: सोडिअम वाफेचा/वायूचा दिवा
अधिक माहिती: हा एक वायूस्थितीतून विद्युतविमोचन घडवला जाणारा विजेवर चालणारा दिवा आहे. या दिव्यांतून साधारणतः पिवळा प्रकाश बाहेर टाकला जातो. हा दिवा रस्त्यांवर प्रकाशासाठी वापरला जात असे. यात काचेच्या नळीत तापवलेल्या सोडिअम धातूच्या वाफेतून वीज वाहून विद्युतविमोचक कंस तयार होतो, ज्याद्वारे शोषलेली उर्जा ही सोडिअम अणूंच्या बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉनला उत्तेजित करते. उत्तेजित इलेक्ट्रॉन ही उर्जा प्रकाशकिरणांच्या स्वरूपात बाहेर उत्सर्जित करतात. अशाप्रकारे सोडिअम वाफेतील अणूंद्वारे विद्युत उर्जेचे रुपांतर प्रकाश उर्जेत केले जाते.