Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Smooth endoplasmic reticulum’ in Marathi
‘Smooth endoplasmic reticulum’ चा मराठी अर्थ
शब्द: Smooth endoplasmic reticulum
उच्चार: स्मुथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम
अर्थ: मऊ आंतर्द्रव्यजालिका
अधिक माहिती: ज्या आंतरर्द्रव्यजालिकाच्या पटलांवर रायबोझोम नसतात अशा आंतरर्द्रव्यजालिकेला Smooth endoplasmic reticulum किंवा मऊ प्रकारची आंतर्द्रव्यजालिका असे म्हणतात. मऊ आंतर्द्रव्यजालिकेमधे अनेक प्रकारच्या जैवरासायनिक प्रक्रिया पार पाडल्या जातात, जसे की, स्फुरिल मेद, स्टेरॉइड व स्निग्ध पदार्थांची निर्मिती इ.