Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sexual reproduction’ in Marathi
‘Sexual reproduction’ चा मराठी अर्थ
शब्द: Sexual reproduction
उच्चार: सेक्श्युअल रिप्रोडक्शन
अर्थ: लैंगिक प्रजनन
अधिक माहिती: Sexual reproduction किंवा लैंगिक प्रजनन हे स्त्रीयुग्मक (फिमेल गॅमेट) आणि पुंयुग्मक (मेल गॅमेट) या दोन जनन पेशींच्या एकत्रिकरणाने साधले जाते. या दोन जनन पेशी अनुक्रमे स्त्री व पुरुष सजीवाद्वारे बनवले जातात. लैंगिक प्रजननात युग्मक निर्मिती (गॅमेट फॉर्मेशन) व फलन (फर्टिलायझेशन) हे दोन टप्पे समाविष्ट असतात.