Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Semen Bank’ in Marathi
‘Semen Bank’ चा मराठी अर्थ
शब्द: Semen Bank
उच्चार: सिमेन बॅंक
अर्थ: वीर्य पेढी, रेत पेढी
अधिक माहिती: Semen bank म्हणजेच वीर्य पेढीमध्ये वीर्य दान करणार्या निरोगी पुरुषांचे वीर्य कमी तापमानावर साठवून ठेवलेले असते. यापुर्वी दात्या पुरुषाच्या सर्वंकष वैद्यकिय चाचण्या केल्या जातात. ज्या दांपत्यांना वीर्याच्या अकार्यक्षमतेमुळे मूल होऊ शकत नाही असे दांपत्य वीर्य पेढीतील वीर्याचा वापर अरू शकतात. या वीर्य/रेताचा वापर करून दांपत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने काचनलिकेत फलित केली जाते आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण (इम्प्लांटेशन) केले जाते. कायद्यानुसार वीर्य दात्याचे नाव गुप्त ठेवले जाते. या पेढीला Sperm bank असेही म्हणतात.