Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Selective permeable membrane’ in Marathi
‘Selective permeable membrane’ चा मराठी अर्थ
शब्द: Selective permeable membrane
उच्चार: सिलेक्टिव्ह परमिएबल मेंब्रेन
अर्थ: निवडक्षम पारपटल
अधिक माहिती: जे पटल (मेंब्रेन) काही ठराविक पदार्थांना आपल्यातून आर-पार ये-जा करू देते, मात्र काही पदार्थांना अटकाव करते (आपल्या स्तरातून आर-पार ये-जा करू देत नाही) अशा पटलाला Selective permeable membrane किंवा निवडक्षम पारपटल असे म्हणतात. पेशीपटल/प्रद्रव्यपटल (सेल मेंब्रेन) हे देखील या प्रकारचे निवडक्षम पारपटल असते. पेशीपटलाच्या या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, प्राथमिक ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात. तर नको असलेले पेशीबाहेर ठेवले जातात.