Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Scientific name’ in Marathi
‘Scientific name’ चा मराठी अर्थ
शब्द: Scientific name
उच्चार: सायंटिफिक नेम
अर्थ: वैज्ञानिक नाव, वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव,
अधिक माहिती: ्प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव (scientific name) देण्यात येते. हे नाव द्विनाम पद्धती (binomial system) ने देण्यात येते. बैज्ञानिक नावात दोन संज्ञा असतात. पहिली संज्ञा प्रजाती (genus) दर्शवते, तर दुसरी संज्ञा जाती (species) दर्शवते. वैज्ञानिक नावे आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या (International Code of Nomenclature) नियमानुसार द्विनाम पद्धतीने देण्यात येतात.