Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Saturated solution’ in Marathi
‘Saturated solution’ चा मराठी अर्थ
शब्द: Saturated solution
उच्चार: सॅच्युरेटेड सोल्युशन
अर्थ: संपृक्त द्रावण
अधिक माहिती: द्रावकामधे विद्राव्य घटकाचे पूर्ण क्षमतेने विद्राव्य झालेल्या द्रावणाला Saturated किंवा संपृक्त द्रावण असे म्हणतात. उदाहरणार्थ, वाटीमधे पाणी घेउन त्यात एक एक चमचा मीठ घालून विरघळत राहील्यास शेवटी अशी वेळ येइल की मीठ टाकले तरी ते विरघळणार नाही. म्हणजेच त्या स्थितीला मीठ त्या पाण्याच्या पुर्ण क्षमते इतके विरघळले आहे. अशा स्थितीत त्या मिठाच्या द्रावणाला saturated solution किंवा संपृक्त द्रावण असे म्हणतात.