Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Rutherford’s nuclear model of atom’ in Marathi
‘Rutherford’s nuclear model of atom’ चा मराठी अर्थ
शब्द: Rutherford’s nuclear model of atom
उच्चार: रुदरफोर्डस न्युक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम
अर्थ: रूदरफोर्डचे केंद्रकीय अणूप्रारूप
अधिक माहिती: अणू कशाचा बनलेला असतो या प्रशाचे उत्तर देण्यासाठी अर्नेस्ट रूदरफोर्ड ह्या वैज्ञानिकाने स्वतः केलेल्या विकिरण प्रयोगातील निष्कर्षाच्या आधारे हे प्रारूप मांडले होते. या प्रारुपानुसार अणूच्या केंद्रभागी जड केंद्रक असते ज्यावर धनप्रभार असतो. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. धनप्रभारित केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ॠणप्रभारित कण वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करीत असतात. केंद्रकावरील एकूण धनप्रभार हा त्याभोवती फिरणार्या सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ॠणप्रभाराएवढा असतो. धन प्रभाराइतकेच ऋणप्रभार असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. अणूचे केंद्रक व त्याभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन ह्यांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोकळी/ रिकामी जागा असते.