Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Rh’ factor’ in Marathi
‘Rh’ factor’ चा मराठी अर्थ
शब्द: Rh’ factor
उच्चार: आर एच फॅक्टर
अर्थ: लाल रक्तपेशींवरचा प्रतिजन आर एच घटक
अधिक माहिती: व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींच्या बाहेरील पृष्ठभागावर असलेल्या प्रतिजनाच्या (ॲटिजन) प्रकारानुसार व्यक्तीचा रक्तगट ठरतो. लाल रक्तपेशींवर A आणि B प्रतिजनाची उपस्थिती किंवा अनुपस्थितीवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत. मानवी रक्ताचे A, B, AB आणि O असे चार प्रमुख गट आहेत. यातही ‘आर एच फॅक्टर’या प्रतिजनाच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवर आधारित ‘आर एच’पॉझिटिव्ह व ‘आर एच’ निगेटिव्ह असे प्रकार असतात. ‘आर एच घटक’(Rh factor) हा सर्वप्रथम ऱ्हीसस (Rhesus) प्रजातीच्या वानरामधे शोधला गेला होता. त्यामुळे त्याला अद्याक्षराप्रमाणे Rh factor असे संबोधले जाते. A, B, AB आणि O असे चार प्रमुख गट व Rh factor ची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यानुसार आठ प्रकारचे रक्तगट असतात. A Rh +ve, A Rh -ve, B Rh +ve, B Rh -ve, AB Rh +ve AB Rh -ve, O Rh +ve आणि O Rh -ve. रक्त पराधनामधे Rh +ve गटाचे रक्त Rh –ve रक्तगटाच्या रक्तग्राहीला चढवलेले चालत नाही.