Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Respiratory system’ in Marathi
‘Respiratory system’ चा मराठी अर्थ
शब्द: Respiratory system
उच्चार: रेस्पिरेटरी सिस्टिम
अर्थ: श्वसन संस्था
अधिक माहिती: सजीवांच्या जीवनप्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. पेशींमधे शर्करेचे ऑक्सिडेशन घडवून ऊर्जानिर्मिती केली जाते. त्यासाठी ऑक्सिजनचा सतत पुरवठा व्हावा लागतो. हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसांमार्फत रक्तात शोषून शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचवणे व टाकाऊ कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे, ही कामे श्वसनसंस्था व रक्ताभिसरण संस्थामार्फत होतात. श्वसनसंस्थेत कार्य करणारे अवयव – नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे.